ह. आ. सारंग - लेख सूची

विवेकवाद आणि नास्तिकता

आपण दररोजच्या व्यवहारात नास्तिकता आणि विवेक यांचा सर्रास वापर करतो. कोणत्याही गोष्टीबाबत सारासार विचार करण्याच्या वृत्तीला लोकभाषेत विवेक करणे असे म्हटल्या जाते. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता ठरविताना किंवा विशिष्ट कृती करताना विवेक बाळगला पाहिजे, असे नेहमी आपल्या कानावर येते. नास्तिकता या संज्ञेबाबत ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणाऱ्याला लोक नास्तिक म्हणतात आणि ते बरेचसे बरोबरही आहे. परंतु …

नीतिविचार

आधुनिकपूर्व काळातील नीतीचे स्वरूपसामान्य बोलचालीत (Common Parlance) नीती म्हणजे ढोबळमानाने व्यक्तीच्या समाजव्यवहारातील वर्तणुकीचे नियम किंवा धारणा (Social Judgements) होय. त्या त्या संस्कृतीमध्ये वर्तणुकीचे ठराविक संकेत असतात. त्यांना त्या त्या समाजाची केवळ मान्यताच असते असे नाही; तर तसे वागण्यासाठी व्यक्तीला प्रोत्साहन दिले जाते, आणि न वागण्याबद्दल तिच्या वाट्याला निंदा येते. या संकेतांचा उगम रूढी, परंपरा, प्रथा …

विचार करण्यासाठी एक विचार

आजकाल लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना का निर्माण होत नसावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तथाकथित विकासासोबत माणूस उत्तरोत्तर आत्मकेंद्री व स्वार्थी बनत आहे, हे आपण पाहतोच, सुखाच्या कल्पना बदलत आहेत. बुद्धिमान मध्यमवर्गीय तरुणानी विनासाची कल्पना एकदम ढूळिलरश्र आहे. आपला देश, आपल्या देशातील लोकांची प्रगती याविषयी इच्छा किंवा निज्ञासा कोणत्याही बुद्धिमान तरुणात दिसून येत नाही. व्यवस्थापन, …

विवेकवादाला एवढे नक्कीच साधेल

धर्म ही एक सामाजिक आवश्यकता आहे असे म्हणता येईल. प्राचीन काळात धर्माने पार पाडलेली सामाजिक कार्ये म्हणजे, (१) विशिष्ट कर्मकांडांच्या निर्मितीमुळे समाज एकत्रित येणे. (२) भीती, अनिश्चितता या भावनांपासून माणसाची बऱ्या प्रमाणात सुटका होणे. (३) मरणाची व अज्ञाताची भीती बरीचशी कमी होणे. (४) मानवी जीवनात देवाचे साह्य मिळण्याची आशा निर्माण होणे. त्यामुळे माणसाची वैफल्यग्रस्तता कमी …

भ्रष्टाचार: कारणे व उपाय (भाग ३)

भ्रष्टाचार निर्मूलनाचे उपाय आतापर्यंत आपण भ्रष्टाचाराची विशिष्ट कारणे, स्वरूप व परिणाम यांच्याविषयी विचार केले. त्यावरून भ्रष्टाचाराचे निर्मूलन ही आजच्या समाजापुढील सर्वांत मोठी समस्या असल्याचे आपणास जाणवते. सदर समस्या सोडविणे हे समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने अपरिहार्य आहे, हेही आपणास पटण्यासारखे आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कोणते उपाय योजावेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्याने व त्याची …

भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग २)

क) पैशाचे साध्यमूल्य साधारणतः पैशाचे साधनमूल्य म्हणून असलेले महत्त्व सर्वच जण स्वीकारतात. तथापि एकदा पैसा मिळविण्यास सुरुवात केली की, त्याचे एक विलक्षण असे आकर्षण निर्माण होते. आणि साधनमूल्य विसरून त्याला साध्याचे स्थान येते. पैसा हेच साध्य ठरल्यावर तो किती व कसा मिळवायचा याला मर्यादा राहत नाहीत. यामुळेच ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असे लोकही मोठ्या प्रमाणात …

भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग १)

प्रास्ताविक आजच्या समाजव्यवस्थेला लागलेला सर्वांत भयंकर रोग म्हणजे ‘भ्रष्टाचार’ होय. भ्रष्टाचारावर सर्वचजण बोलत-लिहीत असतात. परंतु भ्रष्टाचाराची मूळ कारणे कोणती आहेत व त्यांचा बीमोड करता येईल काय, त्यासाठी कोणता ठोस कार्यक्रम हाती घेता येईल, याचे फारसे विश्लेषण सामान्य माणूसही करीत नाही. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाविषयी स्वप्नाळू व आदर्शवादी कल्पनांना कठोर वास्तवाचा आधार नसल्याने त्यांचा भ्रष्टाचार-निर्मूलनाच्या दृष्टीने फारसा उपयोग …

आदर्श नेतृत्व असे असावे 

सामान्य माणूस हा कोणतीही घटना, व्यक्ती, विचार किंवा प्रश्न यावर वरवर विचार करतो. त्याच्या विचारात सखोलता नसते व त्याचे विचार सर्वकषही नसतात. नेत्याने सामान्य माणसाला त्याचा विचार हा सखोल नाही, हे पटवून द्यायला पाहिजे. आणि त्यासोबतच त्याने कोणतीही व्यक्ती, विचार, घटना किंवा प्रश्न यावर कसा विचार करावा, हे त्याला शिकविले पाहिजे. लोकांच्या खऱ्या गरजा कोणत्या …

परंपरा : अभिमान आणि उपमर्द

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील संभाजी ब्रिगेडच्या हल्ल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात चर्चेचा गदारोळ उठल्याचे दिसून येते. जो तो उठतो व सदर घटनेसंबंधीचे आपले आकलन मांडायला सरसावतो. त्यात मीही या निमित्ताने थोडी भर टाकू इच्छितो. खरे तर मला या घटनेच्या निमित्ताने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची चर्चा करावयाची आहे. या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात हा वाद पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. हा …

राग आणि अभिव्यक्ती

श्री विजय तेंडुलकरांच्या वक्तव्यांवर नेहमीच वाद निर्माण होत असतात. असे का होत असावे, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तेंडुलकर हे विचार करणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय ते मनाने अधिक संवेदनशीलही आहेत. त्यांनी मांडलेले मत किंवा व्यक्त केलेले विचार बुद्धीने व मनाने समजावून घ्यावे लागतात. त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ, त्यांमागची भूमिका समजावून घेतली तरच समजते. ते केवळ कोरडे विचारवंत …